Sunday, 6 February 2022

सुरमयी संध्याकाळ


         
     कवितेच्या ओळींना सुरांची साथ. संगीताच्या क्षेत्रात अखंड तेवणारी वात. नव्या नवलाईसाठी प्रेरणादायी सुरवात. बाप्पा समोर आपसूक जोडले गेलेले हात. लिहिणार्याने लिहीत जावे. संपून जाव्या ओळी. एक सुर कायमचा आठवणीत राहावा. असे सूर आणि सुरेलपण. मैफिलीतला एक स्वर. एक ध्रुवतारा. निःशब्द झालाय आसमंत सारा. असं आणि बरंच काही तिने निर्माण केलं. जिंकलं...जपलं... त्या लता... लता दीदी...

      एक गोष्ट सूरु झाली. एक ओळ... एक गाणं तिच्यासाठी लिहिलं. सोनेरी ग्रामोफोनने तिची गाणी ऐकली. रेडिओवर कितीदा दिवसाची सुरुवात तिच्या गाण्याने झाली. यु ट्यूबच्या पडद्याने ही तिला अजरामर केले. अशी जगातल्या सात आश्चर्यानंतरचे आठवे आश्चर्य. सात सुरांना बांधून ठेवणारा आठवा सुर... दोन तीन पिढ्या गेल्या तरी टेबलावरच्या त्या रेडिओवर आज ही रिवाईन्ड बटणावर येऊन थांबणारी सुरमयी संध्याकाळ.
    मला आठवते, सूर्यास्त डोईवर होताना तिचं गाणं “ सख्या तुला भेटतील माझे...तुझ्या घरी सूर ओळखीचे ... उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे...” आज ही जिवंत आहे. आज जरी त्या अबोल पारिजातकाचा सडा नाही, तरी त्याचा सुगंधी दरवळ कायम आहे. सततचा फुलांचा वर्षाव झेलता झेलता तिथल्या मातीत, तिथल्या जमिनीत तो मुरलाय. भिनलाय आता तोच मागे उरलाय...

     रात्रीच्या काळोखात, संकटात, अडचणीच्या वेळी “ लुक्का छुपी बहुत हुई सामने आजा ना... “ म्हणणारी आईची माया...” जरा याद रखो कुर्बानि “ म्हणणारी भारत माता. कधी प्रेमात पाडणारी प्रेयसी... वेगवेगळ्या लोभस रूपात, आवाजात ती उमगते.

     “ तुफान को आना है...आकर चले जाना है... बादल है कुछ पल का... छा कर ढल जाना है...परछाईया रह जाती ...रह जाती निशानी है...जिंदगी ओर कुछ भी नही ‘तेरी मेरी कहानी है...” आज ही दीदींच्या आवाजातले ते शब्द कित्येकांच्या आयुष्यात अजरामर आहेत आणि कायम राहतील...खरंच जिंदगी ओर कुछ भी नहीं ...”
हेच खरे.

    

18 comments:

Unknown said...

बहोत खूब जुईली 👌👌👌

Unknown said...

👌🏻👌🏻

Ashish said...

सात सुरांना बांधून ठेवणारा आठवा सुर.अप्रतिम,सुरांजली सम श्रद्धांजली वाहिलीस खरी 💐 - आशिष

जुईली अतितकर said...

Thank you 😊

जुईली अतितकर said...

Thank you 😊

जुईली अतितकर said...

Thank you 😊

Unknown said...

Khup chan

Things and Thoughts said...

ही भावपूर्ण सुरांजलीची शब्दांजली नक्कीच दिदींपर्यंत पोहचेल 🙏🙏🙏

जुईली अतितकर said...

Thank you 😊

जुईली अतितकर said...

Thank you 😊

Gauri Dhanwate said...

खूप खूप सुंदर!!🥺❤️❤️

Unknown said...

अप्रतिम , जुईली

जुईली अतितकर said...

Thanks gauri❣️

जुईली अतितकर said...

Thank you ❣️

Pragati Deshmukh... said...

वाह... आठवा सूर

जुईली अतितकर said...

Thanks pragati❣️

Anonymous said...

नेमकेपणे लतादीदींचे स्वर कानावर पडल्यावर जे भाव उचंबळून येतात त्याचे वर्णन नोजक्याच शब्दात केले आहेस. माझ्या आयुष्यात अनेक सूर्यास्त लतादीदींच्या स्वराने पुलकित झाले. पण त्यांच्या नंतर आता सूर्यास्त देखील पोरके झाले.

जुईली अतितकर said...

Thank you ...Well commented ✍️

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...