Wednesday, 23 September 2020

करिब करिब सिंगल


             आयुष्यात आपल्या त्याच त्या सवयी, नेहमीचं नियोजन आणि कधीतरी अचानक कोसळलेलं एकटेपणाच ओझं वाहताना नवी सुरवात कधी तरी करावीशी वाटते. तिला ही वाटली. नुकतेच लग्न झालेली ती कथेची नायिका पण अकस्मात पतीच्या निधनामुळे आलेला एकटा प्रवास ती करत असते. नव्या जोडीदाराच्या शोधात डेटिंग साईटवरून सुरू झालेली ही गोष्ट. तिचा प्रवास देहरादून, दिल्ली करत तिच्या एकलेपणाला मागे टाकत “ योगी की कहानीया “ पूर्ण करत करत शेवटाला येतो. चित्रपटाच्या शेवटी गाण्याच्या काही ओळी आहेत “ वो जो था ख्वाब सा, क्या कहे जाने दे...वो जो है कम से कम, ये रहे के जाने दे “
आपल्या आयुष्यात येणारी वेगवेगळी माणस आणि त्यांना प्रत्येकाला जिंकण्यासाठी आपली सुरु असलेली चढाओढ. आपल्या हातात असताना नसताना गमावलेली माणस आणि त्यात हरवलेलं आपलं काहीतरी. हे सगळंच या चित्रपटात पाहायला मिळेल. खर सांगायचं तर आपण आपल्याच चार माणसात आपली जागा शोधत असतो. ती निर्माण करत असतो. त्यात ही आपल्याला हवी असलेली किंवा न कळत आपल्याशी बांधली गेलेली माणस जपत जपत आयुष्य काढत असतो. आपल्या आयुष्याची तीच घडी मोडणारी एखादी दुसरी व्यक्ती आपल्या सहवासात येते, तेव्हा खर तर ती घडी मोडणे जरुरीचे असते. त्यामुळे होणारे बदल आपल्याला गरजेचे असतात. एखाद्याला कोणी विचारपूस करणारे जवळ नाही हे दुःख असते पण यापेक्षा मोठं दुःख आपली निंदा करणारी माणस आजूबाजूला असणे हे जास्त मनात सलत असतात. अशी अवस्था झालेली या कथेची नायिका आणि नायक आयुष्यातुन निसटून गेलेल्या त्याच व्यक्तीच्या शोधात एकमेकांना भेटतात आणि दोन विरुद्ध विचार सरणीच्या या दोघांना बांधणारा हा पूल एका डेंटिग साईट वरून सुरू होऊन आसामच्या पहाडात संपतो.

No comments:

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...