Friday, 18 September 2020

भेटली तू पुन्हा

     “भेटली तू पुन्हा” चित्रपट प्रदर्शित झाला होता. सहकुटुंब पाहण्याचा योग आला. सुरुवातीला हिंदीतल्या जब व्ही मेट चा रिमेक वाटायला लागला. पूर्वग्रह आणि वास्तविक अनुभव किती वेगळा असू शकतो. त्यातून बदलत गेलेले निर्णय यावर ही कथा रंगली आहे. नुसत्या घटकाभराच्या ओळखण्यात आणि समोरच्या व्यक्तीला समजण्यात आपण कधी कधी गल्लत करतो. हे या चित्रपटाच्या शेवटी जाणवते. कदाचित त्याच उत्सुकतेपोटी हा चित्रपट पूर्ण पाहिला.
मला प्रकर्षाने लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे त्यातल्या नायिकेच वाक्य “ प्रवासात खूप मजा मस्ती करत जाऊ “ यावर “आपण काही लहान आहोत का ? “ या प्रश्नावर उत्तर म्हणजे या संपूर्ण चित्रपटाचा गाभा, ज्यात ती बोलते “ या ट्रेन मधून आपल्या सोबत आपल्या बॅगा आणि समान ही हा प्रवास करत आहेत मग त्यात आणि आपल्यात फरक तो काय ? यालाच तर जगणं म्हणतात ना. “
खरं तर आपण सगळेच प्रवास करतोय. आपापली ओझी उचलत. काहींची लहान आहेत तर काहींची मोठी, पण त्यात ही काही नुसती ओझी वाहत प्रवास करत आहेत तर काही त्यातही आनंद आणि अनुभव घेत आहेत. आपण नक्की कोणत्या कॅटेगरी मध्ये बसतो असा प्रश्न तेव्हा प्रत्येकाला स्वतः ला विचारावासा वाटला असणार. मी ही विचारला…. तेव्हा मला ही ‘ हो ‘ किंवा ‘ नाही ‘ मध्ये एक उत्तर सांगणे अवघड वाटू लागले. आपण कुठे एवढा विचार करतो या गोष्टीचा…
आपल्या या प्रवासात आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपण कुठल्या तरी एका डब्यात “ती “ च्या सोबतचे प्रवासी असतो. प्रवास सुरु असतो पण त्या गाडीला एकच डबा नसतो ना... असे अनेक डबे आपल्याला आधी मिळालेले असतात. तेवढ्या एक डब्यातील त्याच विश्व म्हणजे तो किंवा ती नसते, मग जर डबा बदलला. पुढची स्टेशन आली की प्रवास वेगळा वाटू लागतो. आणखी रंगत जातो आणि आपले निर्णय बदलत जातात. मोठमोठी कोडी सोडवणारे आपले डोके कधी कधी साध्या साध्या गोष्टी ही समजू शकत नाही किंवा त्याचा अंदाज ही घेऊ शकत नाही, त्यासाठी तो प्रवास सोबत अनुभवावा लागतो. तेव्हा मनाची कवाडे आपोआप उघडी होतात.
“ तुला पाहिले अन सांज मंद झाली
ओशाळल्या चांदण्या हवा कुंद झाली
शुद्धीत होते आताच सारे
तू पाहिले अन वेळ धुंद झाली...”
या चित्रपटतल्या ओळी मनातून जात नाहीत. तीच जागा जिथे आपण तिला निवडायचे असते. तेव्हा कुठे गाडी योग्य वाटेवर येते. मत बदलतात, निर्णय बदलतात. आणि तेव्हा ‘ भेटली तू पुन्हा ‘ असे वाटू लागते.

6 comments:

Omkar Bhoir said...

हो अगदीच... दीदी छान लिहले😊🌺

जुईली अतितकर said...

धन्यवाद ओंकार🙂

Unknown said...

Chan lihila aahes👌🏻🙂

जुईली अतितकर said...

Thanks shruti❣️

Harshada Bhangale said...

खूप छान!😍✨💯..तो चित्रपट म्हणजे खूपच भारी✨🙌..खूप अप्रतिम लिहिले आहेस ताई!💫😍

जुईली अतितकर said...

Thank you❣️....

निवडुंग

खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...