" एकटी
एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही." या संदीप
खरे यांच्या ओळी म्हणता म्हणता कधी डोळा लागायचा कळायचे नाही. उद्याची स्वप्न पाहता
पाहता झोप लागायची आणि हळूहळू त्याच स्वप्नासाठी दूरचीच वाट दिसायची. आजही आई ती वाट
पाहून थोडी घाबरतेच; पण हा लांबचा मार्ग चालण्याचं
ध्येय आणि ऊर्जा ही तिचं देते. आई म्हणजे दिशा, आपल्या आयुष्याची रूपरेषा, निराशेतून
वर येण्याची आशा, व्यक्त होणारी अबोल भाषा. लहानपणापासून आईविषयी बोलायची, लिहायची
संधी प्रत्येकाला मिळते आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला नव्याने आई कळते.
निस्वार्थी प्रेमाचा झरा, चूक करताना एकदा तरी तिचा विचार करा, अशी आई.
एका दिवसाच
कौतुक नको असतं तिला, फक्त थोडा वेळ मागते ती आपल्याला. कदाचित तोच आज मी तिला दिला.
प्रत्येकानेच एकदा तरी सांगावे तिला " एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच
तर सोडून तुला लांब गेलो नाही.
💞मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💞
No comments:
Post a Comment