जादूचे पेन ही मूळची इंग्रजी कथा. इमा नावाच्या मुलीला लिहिण्याची आवड होती. तिची एक स्वतःची वही होती, ज्यात तिने साहसी कथा, परिकथा आणि गुढ गोष्टी लिहून ठेवल्या होत्या.
एकदा खूप पाऊस पडत असताना इमा दुपारी तिच्या आजीच्या खोलीत आली. तिने तिच्या आजीच्या कपाटातील एक गुप्त कप्पा उघडला. तो कप्पा आवरताना तिला त्याच्यात एक सोनेरी रंगाचे पेन पडलेले दिसले. उत्सुकतेने तिने ते पेन हातात घेतले आणि निरखून पाहिले. त्या पेनाच्या एका बाजूला कोरले होते ते तिने वाचले " या पेनाचा योग्य वापर करून लिहा आणि ते शब्द खरे होतील " हे वाचल्यावर आश्चर्यचकित होऊन तिने ते पेन आपल्या खोलीत आणून एक कथा लिहायला घेतली. त्या कथेत एका लहान मुलीला तिच्या अंगणात एक मौल्यवान खजिना मिळतो. असा त्या कथेचा शेवट होता. कथा लिहून झाल्यावर चमत्कारिक गोष्टी घडायला सुरुवात झाली. बाहेरच्या अंगणातील जमीन हलायला लागली आणि थोड्याच वेळात एक सोनेरी पेटी तिथे प्रकट झाली. ती पेटी पाहून चकित झालेली इमा बाहेर अंगणात धावत आली. तिने ती पेटी हातात घेतली आणि उघडली. त्यात तिला चमकणारे आकर्षक असे खडे मिळाले. ती तिच्या खोलीत धावत आली. ती मनातल्या मनात म्हणाली, "खरंच हे पेन लिहिलेल्या सर्व गोष्टी खरे करेल?"
पुढच्या काही दिवसात इमाने वेगवेगळ्या गोष्टी लिहून पाहिल्या. तिने एका कुत्र्याशी मैत्री करण्याबद्दल लिहिले आणि त्याच दिवशी एक गोंडस कुत्र्याचे पिल्लू तिच्या दाराशी आले. नंतर तिने प्रकाशमान दिवसांविषयी लिहिले आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी सुरु असलेला पाऊस थांबला आणि स्वच्छ निरभ्र आकाश दिसू लागले.
एकदा इमाने तिच्या या जादुई पेनाबद्दल आपल्या जिवलग मित्राला मॅक्सला सांगायचे ठरवले. एका संध्याकाळी तो घरी आला. तेव्हा तिने त्याला ते पेन दाखवले. त्या पेनाची जादू सांगितली. मग दोघांनी मिळून कलात्मक, सुंदर, संवेदनशील गोष्टी लिहायला सुरुवात केली, जसे की त्यांच्या शाळेत फुलझाडे लावणे, एकटे पडलेल्या माणसांना मित्र भेटणे अशा अनेक गोष्टी त्यांनी लिहिल्या.
अचानक एके दिवशी इमा आणि मॅक्स यांच्यामध्ये भांडण झाले. पुढचा मागचा विचार न करता इमाने त्या पेनाने लिहिले " जोपर्यंत मॅक्स माझी माफी मागत नाही, तोपर्यंत त्याचा आवाज बंद होईल " त्या क्षणी मॅक्सचे बोलणे थांबले. तो अचानक शांत झाला. तो शांत झाल्याने इमा पुरती घाबरली होती. त्याचा आवाज कायमचा जावा असे तिला अजिबात वाटत नव्हते. लगेच तिने त्याची माफी मागितली आणि वहीवर लिहिले " मॅक्स चा आवाज पुन्हा यावा " मॅक्स पुन्हा बोलू लागला. तोही सुरुवातीला घाबरला होता. नंतर दोघेही हसायला लागले. तेव्हाच त्यांनी या पेनाने दुसऱ्याच्या हिताचे आणि चांगलेच लिहायचे ठरवले. नंतर बरीच वर्ष गेली. इमाने ते पेन सुरक्षित आणि गुप्त ठेवले जेव्हा एखाद्याला चांगल्या कामासाठी त्याची मदत होईल तेव्हाच तिने ते वापरले. इमाकडे असलेले पेन जरी जादूई आणि अद्भुत असले तरी खरी जादू ही संवेदनशील शब्दात आणि इतरांना मदत करण्यात आहे हे इमाला कळले होते.
डायरीतल्या आठवणी आणि अनुभव याचा एक किस्सा. प्रत्येक वेळी नव्याने उलगडत जाणारी माझी डायरी आणि त्यातले एक " आठवणीतले पान " - जुईली अतितकर
Monday, 26 January 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
निवडुंग
खिडकीत लावलेली तुळस चांगली वाढली होती. दुपारची वेळ होती. उन्हाचा तडाखा बघून मी तुळशीला पुन्हा पाणी घातले. तुळशीच्या त्या पानांवर...
-
सखी चतुर्थीच्या सुट्टीची दरवर्षी आतुरतेने वाट पाहायची. गणपती बाप्पा हे एक आकर्षण होतेच पण त्याहून मोठे आकर्षण म्हणजे गणपतीची सुट...
-
दीपावलीच्या प्रकाशमान पर्वाला सुरुवात झाली तसे " काव्यजुई " हे पुस्तक या दीप पर्वात प्रकाशित होण्याचे वेध लागले. काव्यजुई हा माझ...
-
चिनूची आज फुलबॉलची मॅच होती. गेले आठवडाभर जोरदार तयारी सुरू होती. दिवस रात्र एक करून भरपूर मेहनत घेतल्यावर आज तो दिवस उजाडला होत...
No comments:
Post a Comment