विसाव्या शतकात जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर सारी जनता दु:खात होती, त्यांना हसवण्याचं कारण बनून आलेला अवलिया एका लहानशा गावात आपल्याच अडचणींतुन वाट काढत, हस्यसम्राट म्हणून उजळत होता. आपल्या विनोदी हालचालीने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या मुकाभिनय आणि विचित्र हावभावाने विनोदी रंगमंचावर आपले नाव कोरणारा एक कलंदर, अफलातून व्यक्तिमत्त्व इंग्लंड मधल्या लंडन शहरात वाढत होता. सर्वसाधारण कुटुंबातून पुढे आलेल्या चार्लीला वडिलांची व्यसनाच्या आहारी गेल्याने हवी तशी साथ मिळाली नाही. लहान वयातच वडीलांचे मद्यपानाच्या सवयीमुळे निधन झाले आणि घरची जबाबदारी दोन भावंडावर पडली. आई घरच्या घरी शिवणकाम करून गरजेपुरते पैसे मिळवत होती. दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची ही शाश्वती नसताना रोज एक वेळ मैद्याचा ब्रेड आणि उकडलेला बटाटा खाऊन महिने काढले. कधी आठवड्याचे सलग दोन दिवस उपासमार झाली. मोठ्या भावाने किस्टोन स्टुडिओ मध्ये आवाज चांगला असल्याने गाण्याचे कार्यक्रम करून पैसे मिळवायला सुरवात केली. आई आणि भावाचे कष्ट पाहून छोटा चार्ली सुद्धा रंगमंचावर आपली कलाकारी दाखवून दोन आणे कमवू लागला. त्यातून त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. बऱ्याचदा आपल्यात असलेल्या कलागुणांना वाट देणारी व्यक्ती आपल्या या प्रवासात कधी ना कधी भेटते आणि तशीच सुमधूर आवाजाची हेना त्याला भेटली. तिच्या सुमधुर आवाजाने चार्ली तिच्याकडे आकर्षित झाला. दोघेही आपापल्या कालागुणांनी रंगमंच गाजवत होते. पण त्यांच एकत्र येणे अधिक काळ टिकले नाही. काही कारणाने हेनाच्या आवाजाने तिच्या अडचणी वाढवल्या. त्यामुळे तिची साथ चार्लीला मिळाली नाही. हेना अचानक दुरावल्याच्या धक्क्यातून सावरतच ज्या आवाजाने आपला ऐन वेळी घात केला त्या आपल्या आवाजाला मागे टाकत मूक अभिनयाची जादुई दुनिया पुढे आणत लिटील ट्रम्पचा जन्म झाला. त्यातूनच या मुकाभिनयच्या नव्या पर्वाला सुरवात झाली.
काळी टोपी, ढगळदार पायघोळ पॅन्ट, पांढरा शर्ट आणि लहानशी मिशी त्यावर न ढळणारे स्मित हास्य. एकाच व्यक्तिमधले हे विरोधाभासी दोन पैलू देणारा हा विनोदवीर . शून्यातून स्वतः ची नवी जागा निर्माण करून जगाला मुक्या भाषेने हसवण्याची नवी कल्पना देणारा चार्ली " हसरे दुःख " स्वतःकडे ठेवून आनंद मात्र वाटत राहिला आणि कायमचा लक्षात राहिला.
No comments:
Post a Comment