चॉपस्टिक हे नाव ऐकल्यावर चित्रपट चिनी, विदेशी किंवा अनिमेटेड वाटेल. पण तसे नाही. हिंदी चित्रपटात तेवढयाच विनोदी पध्दतीने वास्तविक सत्य मांडले आहे. “ निरमा “ कथेची नायिका. थोडी भोळी, भित्री तरीही सगळे सांभाळण्याच्या प्रयत्नात असणारी, स्वतःला कॉर्पोरेट विश्वात “ कॅरी “ करण्यासाठी धडपडणारी मुलगी. याच भोळ्या स्वभावामुळे पहिल्याच दिवशी खरेदी केलेली गाडी चोरीला जाते आणि त्यानंतर ती गाडी शोधण्याचा प्रवास म्हणजे हा चित्रपट. तिला भेटलेला कथेचा नायक “ आर्टिस्ट “ कथेच्या शेवटी तिच्या गाडी सोबत तिचा हरवलेला आत्मविश्वास ही तिला परत मिळवून देतो.
संकट आले की सर्व रस्ते बंद होतात. त्यातून बाहेर पडण्याचा एक ही मार्ग मिळत नाही. अशा वेळी निरमा उंच इमारतीच्या टोकावर उभी असते. तेव्हा उडी मारायचीच आहे. तर ती आत ही मारू शकतो किंवा एकदा हरवलेली गाडी शोधून “ हे आर्टिस्टचे उत्तर आपल्या ही बऱ्याच प्रश्नांना उत्तर होऊ शकते. आर्टिस्ट खर तर एक चोर दाखवला आहे. सेकंदात बंद कुलूपाचे टाळे खोलणारा आर्टिस्ट, पण ही कला इतक्या लकबीने कशी जमते याचे उत्तर देताना तो म्हणतो “ हर ताले का एक दिल होता है, मै उस दिल की आवाज सूनता हू “ खर तर हा ताला कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्या जिभेवर ही असतो. ज्याची किल्ली मनात असते. ज्याला तो आवाज ऐकू येईल तो “ आर्टिस्ट “ नाही का !
आपली चोरीला गेलेली गाडी म्हणजे आपले अंतिम ध्येय... ती गाडी हुडकून काढण्यासाठी गुंडाच्या घरी जाऊन बाहुबलीचे अपहरण करण्या पर्यन्त कथा जाते. इथे आर्टिस्टचे एक सुरवातीचे वाक्य “ हर किसींको कभी ना कभी चोरी करनी पडती है “ .जिने आजवर कधीच आडवी वाट निवडली नसेल ती सहज एका गुंडाच्या घरी दाखल होते. तिथल्या बाहुबली नावाच्या बकऱ्याला चोरते. तिथे ही गाडीच्या मागे लिहिलेलं वाक्य “ दम है तो क्रॉस कर , वरना बरदाश कर “ हा तिच्यात झालेला बदल संपूर्ण चित्रपटात दिसतो.
ती चोरी केलेला बाहुबली परत करण्यासाठी त्या गुंडाकडे परत येते तेव्हा खर तर परत आपल्या गावी जाण्याचा मार्ग तिच्याकडे असतो पण ती बाहुबलीला परत देऊन जाते. का तर तिची सगळ्यात जवळची वस्तू त्या गुंडांनी चोरलेली असते ती म्हणजे गाडी पण बाहुबली काही वस्तू नाही तो मुलाच्या मायेने वाढवलेला बकरा असतो. त्याच्यासाठी एक चॉकलेट देऊन ती तिथून निघते. आर्टिस्ट मागेच उभा असतो. गुंड शरमेने तिची गाडी परत देऊन टाकतो. चित्रपटाच्या सुरवातीला गाडी चोरी होते तेव्हा एक वाक्य टॅक्सीच्या मागच्या काचेवर लिहिलेलं असते “ one mistake, game over “ पण एका चुकीमुळे एक कथा सुरू झाली आणि निरमाला त्या अनुभवाने कायमचे बदलले.
4 comments:
👌👌👌
नेहमी प्रमाणेच एकदम झकास 👌👌
Thanks प्रणिता ताई 😊
धन्यवाद😊
Post a Comment