समाज सुशिक्षित व विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या स्तरातील माणसे एकत्र येतात तेव्हाच हे साध्य होते. विकसित देशात सातत्याने कार्यरत असणारे आणि उच्च स्थान गाठणारे यशस्वी पुरुष किंवा खेडेगावात मोलमजुरी करणारे मजूर कुठल्या ना कुठल्या मानसिक व शारीरिक व्याधीनी ग्रस्त आहेत. त्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक निराषेतून आत्महत्येची पायरी गाठली जाते. अशा वेळी त्यांना साहाय्य करण्यासाठी त्यांचे कुटुंब असते. त्यासोबत अनेक संस्था, समुपदेशक पुढे येतात. जागतिक पुरुष दिनानिमित्त पुरुषांच्या आरोग्यासाठी हा दिवस जगात साजरा होतो.
जगभरात हा संपूर्ण महिना वेगवेगळ्या तऱ्हेने साजरा केला जातो. मोवेंबर फाउंडेशन यात सक्रिय योगदान देते. याची सुरुवात २००३ मध्ये मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे झाली. ३० जणांच्या साहाय्याने सुरु केलेली ही वाटचाल आता ६ दशलक्ष लोकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. त्या संस्थेमार्फत पुरुष वर्गात मानसिक, शारीरिक स्वास्थ्याविषयी जनजागृती केली जाते. त्यात मुख्यत्वे पुरुषांना होणारे गंभीर आजार जसे टेस्टीक्युलर कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग, वाढते आत्महत्येचे प्रमाण, नैराश्य व अन्य विकार यांचा समावेश आहे. यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे लवकर निदान करून त्यावर वेळीच उपचार करणे, गरजूना मदत करणे अशी कामे या संस्थेमार्फत होतात. ऑस्ट्रेलिया मध्ये पुरुष संपूर्ण महिनाभर मिशा वाढवतात. मिशी वाढवणे ही त्याची खूण मानली जाते. त्यांच्या भाषेत मो म्हणजे मिशी. पुढे या नोव्हेंबर महिन्याला मोवेंबर संबोधले गेले. हळूहळू याची दखल इतर देशात ही घेतली गेली. त्यात डेंमार्क, कॅनडा, जर्मनी, स्पेन, न्यूझीलंड, नॉर्वे, यू. के, यू. स, स्विडन, आयरलंड या सारख्या देशांचा समावेश आहे. जगभरातून या कार्यासाठी देणगी दिली जाते. या फाउंडेशन च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात, ज्यात लोक सहभागातून माणसे एकमेकांशी जोडले जातात. त्यांचे हे कार्य पुरुषांच्या प्रति समाजात सकारात्मक विचार रुजवत आहे.
निरोगी समाजाचा पाया म्हणजे स्त्री आणि पुरुष. धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे ही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी उचललेले हे एक पाऊल येणाऱ्या आव्हानासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
संदर्भ : Movember Foundation
Movember - changing the face of men's health - movember
No comments:
Post a Comment